आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:मू. जे. महाविद्यालयातील परिसर‎ मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड‎

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎मुळजी जेठा महाविद्यालयाच्या (स्वायत्त) वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्लेसमेंट सेलतर्फे विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंटचे ‎आयोजन करण्यात आलेले होते. कंपनीतर्फे विद्यार्थ्यांच्या मुलाखती ‎घेण्यात आल्या. त्यात सात‎ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.‎ या मुलाखतीसाठी बी.कॉम.,एम.कॉम. तसेच बी.बी.ए या ‎विद्याशाखांचे असे एकूण ३०‎ विद्यार्थी उपस्थित होते.

वाणिज्य व ‎ व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्लेसमेंट‎ सेलतर्फे रोजगाराच्या विविध‎ प्रकारच्या संधी उपलब्ध करून‎ दिल्या जातात. या मुलाखतीसाठी‎ वाणिज्य विद्या शाखाप्रमुख डॉ. ए.‎‎ पी. सरोदे , व्यवस्थापन विद्या‎ शाखाप्रमुख अब्दुल आरसीवाला,‎ प्लेसमेंट अधिकारी डॉ. विवेक‎ यावलकर, डॉ. विशाल देशमुख,‎ प्रा. नितीन चौधरी तसेच विद्यार्थी‎प्रतिनिधींनी सहकार्य केले. या‎ माध्यमातून कंपनीच्या प्रतिनिधींनी‎ विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून‎ त्यांची निवड केल्याने, रोजगाराची‎ संधी मिळाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...