आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा जाेर वाढला:जामनेर, पाचोरा, चोपड्यात पावसाचा जोर अधिक

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला असून १ जून ते २४ जुलैपर्यंत पावसाने ३०० मिलिमिटरचा टप्पा पूर्ण केला. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १०.७ मिमी पावसाची नाेंद करण्यात अाली. पुढील दाेन दिवसांत पावसाचा जाेर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात अाला अाहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात जाेरदार पावसाचा अंदाज वर्तवला अाहे. रविवारी दुपारी जळगाव शहरात पावसाने रिमझिम हजेरी लावली. जामनेर, यावल, पाराेळा, पाचाेरा, भडगाव अाणि चाेपडा तालुक्यात पावसाचा जाेर अधिक हाेता. जिल्ह्यात रविवारी जळगाव ९.४ मिमी, भुसावळ ७.९, यावल १९.८, रावेर ७.९, मुक्ताईनगर २.७, अमळनेर १.९, चाेपडा १४.७, एरंडाेल ६.४, पाराेळा ११.५, चाळीसगाव १६.३, जामनेर १५.६, पाचाेरा १५.८, भडगाव १३ अाणि बाेदवड तालुक्यात ५.१ मिमी पावसाची नाेंद झाली.

बातम्या आणखी आहेत...