आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:गोद्री कुंभात 11 रथांमध्ये 25पेक्षा‎ अधिक संतांचे पुष्पवृष्टीने स्वागत‎

जामनेर/जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व‎ लबाना नायकडा समाजाच्या‎ कुंभास, बुधवारपासून गोद्री येथे‎ प्रारंभ होत आहे. २५ ते ३० जानेवारी‎ या काळात होणाऱ्या या कुंभानिमित्त‎ २४ रोजी संतांची शोभायात्रा,‎ कुंभस्थळ ते धर्मस्थळापर्यंत‎ काढण्यात आली. या शोभायात्रेत ११‎ रथांमध्ये २५पेक्षा अधिक संत‎ उपस्थित होते. तसेच ३० हजारांवर‎ भाविक सहभागी झाले होते.‎ साेमवारी गोद्रीसह परिसरातील ६‎ ते ७ किमी परिघातील गावांमध्ये‎ बंजारा समाजाच्या संतांचे आगमन‎ झाले होते. २४ रोजी सकाळी सवाद्य‎ शोभायात्रा काढून संतांचे कुंभस्थळी‎ आगमन झाले. शोभायात्रेच्या‎ अग्रस्थानी सजवलेल्या वाहनात‎ संत श्री धोंडिरामबाबा, आचार्य श्री‎ चंद्रबाबा महाराज यांच्या मूर्ती होत्या.‎ अग्रस्थानी बाबूसिंग महाराज यांचा‎ रथ होता.‎

शाेभायात्रेत भाविकांनी केली पुष्पवृष्टी‎ शोभायात्रेदरम्यान महिला, पुरुष भाविकांनी वाद्यांच्या‎ तालावर नृत्य केले. नागरिकांनी रथातील संतांचे दर्शन‎ घेतले. शोभायात्रेच्या मार्गावर भाविक दुतर्फा उभे राहून‎ पुष्पवृष्टी करत होते. गोद्री गावात संतांच्या स्वागतासाठी‎ दुतर्फा रांगोळ्या काढलेल्या होत्या. शोभायात्रेत महिला‎ डोक्यावर कळस व तीज घेऊन सहभागी झाल्या होत्या.‎ शोभायात्रेत ५ डबे असलेली रेल्वेगाडी आकर्षणाचे केंद्र‎ होती. युवकांनी बंजारा समाजाचा श्वेतध्वज आणि हिंदू‎ धर्माचा भगवा ध्वज हाती घेतला होता. ‘जय सेवालाल’‎ व ‘जय श्रीराम’च्या घोषणा भाविकांनी दिल्या.‎गाेद्री येथे कुंभानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील रथातून संतांचे आगमन झाले.‎

बातम्या आणखी आहेत...