आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय:डीफ्रीजच्या कॉम्प्रेसरसाठी शवागारात लावले कुलर; पारा 45 अंशापार गेल्याने जीएमसीतील उपाय

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनाेळखी, बेवारस मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवागारात तीन दिवस राखून ठेवले जातात. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान चाळीशीपार आहे. त्यामुळे शवागारातील डीफ्रीजचे कॉम्प्रेसर पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने त्या ठिकाणी कुलर लावण्यात आले आहे.

शहरासह जिल्ह्यात विविध अपघातात किंवा इतर घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्ती ज्यांची ओळख पटलेली नाही त्यांचे मृतदेह शवागारात डीफ्रीजमध्ये तीन दिवस ओळख पटवण्यासाठी राखून ठेवले जातात. गेल्या आठवड्यापासून शहराच्या तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढेच आहे. शवागारात डीफ्रीज ठेवलेल्या खोलीचे तापमानही ४० अंशांच्या पुढे गेल्याने त्याचे कॉम्प्रेसर पूर्ण क्षमतेने काम करत नाही. परिणामी मृतदेहाचे विघटन होण्याचा वेग दुपटीने वाढला आहे. दाेनच दिवसात या शवागारात दुर्गंधी पसरते आहे, असे अनाेळखी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या इसाक बागवान यांनी सांगितले.

तातडीच्या उपाययोजना
तापमानात वाढ झाल्याने शवागाराच्या खोलीचेही तापमान वाढले आहे. त्याचा परिणाम डीफ्रीजचे कॉम्प्रेसर पूर्ण क्षमतेने थंड करण्याचे काम करत नाही. त्यासाठी शवागाराला दोन कुलर दिले आहेत. त्यापैकी एक सुरु आहे.
डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी

बातम्या आणखी आहेत...