आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचानकपणे बंगल्यात शिरलेल्या पाच दरोडेखोनी मायलेकींवर हल्ला चढवत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघींनी धैर्याने दरोडेखोरांचा सामना करत आरडाओरडा केली. त्यामुळे शेजारच्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने दरोडेखोरांना दोन मिनिटांमध्येच पळ काढावा लागला. रविवारी रात्री 8.30 वाजता जिल्हापेठ परिसरातील अशोक जैन यांच्या बंगल्यात हा प्रकार घडला. मंगळवारी पहाटे 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक जैन हे औषधींचे होलसेल व्यापारी आहेत. घराखाली गोदाम, दुकान व वरच्या मजल्यावर त्यांचा बंगला आहे. रविवारी रात्री जैन हे पावभाजी आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नी उर्मिला व मुलगी रिद्धी या दोघीच बंगल्यात होते. रात्री 8.30 वाजता पाच दरोडेखोर त्यांच्या दारी आले. दरवाजा उघडताच दोन्ही हाताने तीचे तोंड दाबून धरले. तरी देखील ती ओरडत होती. मधल्या खोलीत असलेली तीची आई उर्मिला बाहेर आली. दरोडेखोरांनी त्यांनाही जमिनीवर पाडून तोंड, गळा दाबला. मारहाण केली. प्रचंड शक्तीचा वापर करुन दोन्ही माय-लेकींनी आरडाओरडा सुरू केली.
अवघ्या दोन मिनीटांचा थरार
‘पकडा, पकडा’ असा आवाज दिला. यामुळे शेजारी राहणाऱ्या मंत्री कुटुंबीयांनी त्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली. हे पाहुन पाचही दरोडेखोरांनी जैन यांच्या बंगल्यातून धुम ठोकली. त्यामुळे जैन यांच्या घरात चोरी झाली नाही. अवघ्या दोन मिनीटांत हा थरार झाला आहे. दरोडेखोर पळुन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलिसांनी त्यावरुन शोध सुरू केला आहे. या प्रकरणी रिद्धी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख याप्रकरणी तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.