आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शिवाजीनगर व वाल्मिकनगर परिसरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि अस्वच्छतेच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. नागरी समस्या सोडविण्यात प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजीमुळे मनपा परिसर दणाणून गेला होता.
आसोदा, भादली, भोलाणे, कडगाव, शेळगाव अशा सर्वच गावातील नागरीकांच्या मार्ग असलेल्या गांधी मार्केट ते श्रीराम चौकादरम्यान वाल्मिक नगरातील रस्ता प्रचंड खराब झाला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरीक ये- जा करतात. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली जात आहे. नगरसेविका कांचन सोनवणे यांनी देखिल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने थेट लोकशाही दिनी आयुक्तांची भेट घेत समस्या मांडली होती. मंगळवारी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 1 ते 4 मधील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. नागरीकांना दररोज अपघातांचा सामना करावा लागत आहे.
अनेक व्याधींमुळे नागरीकांच्या आरोग्यावरील वैद्यकीय खर्च वाढला आहे. प्रशासन केवळ आश्वासन देते परंतु प्रत्यक्षात कामांना सुरूवात करत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वारंवार निवेदन देवूनही उपयोग होत नसल्याने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शिवाजी नगर व वाल्मिक नगरातील नागरीकांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्याशी समस्यांबाबत चर्चा केली.
पावसाळ्याचे दिवस असल्याने काही समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन लढ्ढा यांनी दिले. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अमोल कोल्हे, भगवान सोनवणे, जितेंद्र सोनवने, किरण राजपूत, सुशिल शिंदे, अभिलाश रोकडे रहिम तडवी, अनिल पटेल, नईम खाटीक आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.