आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उद्धव ठाकरेंना हनुमान जागा दाखवेल':तुरुंगात 12-12 तास हनुमान चालिसा पठण केले आहे, खा. नवनीत राणांची टीका

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेचा वापर करुन मला तुरुंगात टाकले. तुरुंगात 12-12 तास हनुमान चालिसा पठण केले आहे. माझ्या भक्तीमध्ये थोडीही ताकत असेल तर हनुमंतराय ठाकरेंना जागा दाखवेल, अशा शब्दांत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

जळगाव शहरातील बालाजी पेठेत महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे सोमवारी रात्री आयोजित कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी हजेरी लावली. यावेळी राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालिसा पठण केले.

यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालिसा म्हटली म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तुरुंगात डांबले. मात्र, आज त्यांच्या घरात सतरंजा उचलायलाही कार्यकर्ता उरला नाही. माजी मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसाने 'पाठ' (धडा) दिली.

आम्ही मोदींचे भक्त

नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही मोदींचे भक्त आहोत. याचा आम्हाला गर्व आहे. महाराष्ट्रावरील संकट दूर होण्यासाठी उध्दव ठाकरेंना हनुमान चालिसाचे पठण करण्याची विनंती आम्ही केली होती. मात्र, त्यांनी पठण केले नाही. आम्हाला तुरंगात टाकून देशद्रोहाचे कलम लावले. न्यायालयात गेल्यानंतर त्याबाबत आम्हाला वकीलांकडून कळाल.

मी कमकुवत नाही

नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थितांना उद्देशून प्रश्न विचारला की, या देशात हनुमान चालीसा वाचणे आणि रामभक्त होणे हा गुन्हा, पाप आहे का? हात वरती करुन सांगा, हा गुन्हा होता का? या देशात हा गुन्हा असता तर हिंदू विचारधारा कधीच संपली असती. ती विचारधारा ठाकरेंनी सोडली. तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न मी केला.मी कमजोर नाही. लढू शकते, पुढेही लढणार आहे.

तुरुंगात चटईही दिली नाही

नवनीत राणा म्हणाल्या, या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेनीं महिलांचा सन्मान केला. नेहमी त्यांना सन्मानीत केले. महाविकास आघाडीसोबत राहून खऱ्या हिंदुत्वाचे विचार उद्धव ठाकरे विसरुन गेले होते. उद्धव ठाकरेंनी एका महिलेला तुरुंगात टाकले. तुरुंगात बसायला चटईही दिली नाही. त्यांनी हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकले. हनुमान चालिसा न वाचल्यामुळेच त्यांचे 40 आमदार बाहेर पडले. आता ठाकरेंची परिस्थिती काय आहे?

मातोश्री हिंदूंचे तीर्थस्थान

राणा म्हणाल्या, आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नाही हजार वेळा मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचा, असे म्हणाले असते. मातोश्री हे हिंदुचे तीर्थस्थान आहे. हनुमानाचे नाव घ्यायला कुणी रोखणारा अजून जन्माला यायचाय. यावेळी नेत्यांचा उल्लेख करताना राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून दोन वेळेस उल्लेख केला. तसेच, जय श्रीराम, जय हनुमानाचा जयघोष केला. यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे,नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...