आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षार्थींकडून नाराजी:एमपीएससीची १३ केंद्रांवर आज परीक्षा

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत रविवारी शहरातील १३ केंद्रांवर ४०३२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात परीक्षा होणार आहे. राज्यसेवा २०२२च्या जाहिरातीमध्ये केवळ १६१ पदच असल्याने स्पर्धा परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने एकूण ५०१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. रविवारी एमपीएससीची पूर्व परीक्षा जळगाव जिल्ह्यासह ३७ जिल्ह्यांच्या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालानंतर पात्र झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे. गर्दी हाेऊ नये म्हणून पाेलिस बंदाेबस्त असेल.

बातम्या आणखी आहेत...