आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद भरती:एमपीएससीची पूर्वपरीक्षा 8 ऑक्टोबरला होणार

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण ८०० पदांची भरती होणार असून, त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२२ ही येत्या ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या पदांची भरती एक चांगली संधी आहे. सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, गट-ब या संवर्गातील ४२ पदांची भरती होईल.

तर वित्त विभागांतर्गत राज्य कर निरीक्षक ७७ पदे, गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक ६०३ पदे, महसूल व वन विभागांतर्गत दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक ७८ पदे असे एकूण ८०० पदांची भरती होणार आहे. पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा डिसेंबर २०२२ नंतर होईल.