आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान अंदाज:आजपासून ‘मृगसरी’ कोसळण्याची शक्यता; जिल्ह्यामध्ये तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात ९ ते ११ जून दरम्यान मृगसरी कोसळणार आहेत. हवामान विभागाने येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात देखील वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर धडक देण्यापूर्वीच त्याचा प्रवास मंदावला आहे. त्यामुळे पुढचा प्रवासही लांबणीवर पडणार आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात ९ जून रोजी ५ मिली मीटरपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. १० जून रोजी १८ तर ११ जून रोजी १० मिलमिीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेगही १८ ते २१ कमिी दरम्यान राहणार आहे. या काळात आर्द्रता सकाळी ७० टक्क्यापर्यंत तर दुपारी ३० टक्यापर्यंत राहू शकते.

तापमान पुन्हा चाळिशीत
गेल्या चार दिवसांमध्ये वाढलेले तापमान पुन्हा खाली येत आहे. ४३ अंशापर्यंत गेलेला पारा पुन्हा खाली उतरला आहे. ८ जून रोजी जिल्ह्यात ४०.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...