आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण कर्मचाऱ्यांनी सोमवारी महागाई, घरभाडे भत्त्यासह इतर सहा मागण्यांसाठी अजिंठा रोडवरील विद्युत भवनात दुपारी १.३० वाजता महावितरण कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेनंतरही कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर बेमुदत आदोलनाचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला. महावितरण कार्यालयात महागाई, घरभाडे भत्त्यासह इतर मागण्यांसाठी विद्युत भवनात निदर्शने करण्यात आली. या द्वारसभेत केंद्रीय सल्लागार पी. वाय. पाटील, परिमंडळ सचिव वीरेंद्र पाटील, संध्या पाटील यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनानंतरही महावितरण कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सर्कल सेक्रेटरी प्रकाश कोळी, विभागीय सचिव नितीन पाटील, चंद्रकांत कोळी, योगेश तावडे, विनोद सोनवणे, भगवान सपकाळे, नीलेश भोसले, कैलास पाटील, विशाल पाटील, विजया कोळी, दिलीप बाविस्कर, पवन बंशी, संतोष सूर्यवंशी, योगेश फालक हे उपस्थित होते.
महागाई, घरभाडे भत्त्याच्या मागणीसाठी घेण्यात आलेल्या द्वारसभेत सहभागी झालेले महावितरण कंपनीचे कर्मचारी. अपंग कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे सेवाशर्ती लागू करा महानिर्मिती व महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करून त्याचा फरक मे महिन्याच्या पगारात देण्यात आला आहे. महावितरण कंपनी प्रशासनाने मे महिन्याच्या पगारात महागाई भत्ता लागू केला; मात्र महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याचा फरक देण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. विनंती बदल्या, सामान्य आदेश ७४च्या लाभासाठी धरणे, ११०० मृत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणे, पदोन्नतीवर पदस्थापना देण्यापूर्वी विनंती बदल्या करणे, अपंग कामगार यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे सेवाशर्ती लागू करणे आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.
अपंग कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे सेवाशर्ती लागू करा महानिर्मिती व महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करून त्याचा फरक मे महिन्याच्या पगारात देण्यात आला आहे. महावितरण कंपनी प्रशासनाने मे महिन्याच्या पगारात महागाई भत्ता लागू केला; मात्र महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याचा फरक देण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. विनंती बदल्या, सामान्य आदेश ७४च्या लाभासाठी धरणे, ११०० मृत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणे, पदोन्नतीवर पदस्थापना देण्यापूर्वी विनंती बदल्या करणे, अपंग कामगार यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे सेवाशर्ती लागू करणे आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.