आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील वर्तणूक:महावितरणचा व्यवस्थापक, लिपिक अखेर निलंबित ; महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तणूक भोवली

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणमध्ये कंत्राटी महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तणूकप्रकरणी महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापकासह लिपिकाला पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी दोघांना निलंबित केले आहे. व्यवस्थापक उद्धव रामभाऊ कडवे व निम्नस्तर लिपिक राजेंद्र नीळकंठ अमोदकर अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहे. पीडीत महिलेने महावितरण कार्यालयाच्या विशाखा समितीकडे कडवे व अमोदकर याने अश्लील वर्तन केल्याची तक्रार दाखल केली हाेती; पण त्याची दखल न घेतल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद भादलीकर (मुंबई) यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले.

बातम्या आणखी आहेत...