आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोर:मुक्ताईनगरच्या सराफाला लुटणारी टाेळी पकडली ; 10 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल केला होता लंपास

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरवेल (ता.मुक्ताईनगर) फाट्यावर गेल्या आठवड्यात सराफा व्यावसायिकाला दरोडेखोरांनी रस्ता अडवून सोने व चांदीचे दागिने आणि रोकड असा १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला हाेता. या टाेळीतील पाच संशयितांना जळगाव एलसीबीने जेरबंद केले. अशी माहिती पोलिस अधीक्षक एस. राजकुमार यांनी रविवारी दिली.

सुनील मिस्त्रीलाल जाधव (वय २३, सुप्रीम कॉलनी), प्रकाश वसंत चव्हाण (३०, सुप्रीम कॉलनी), आकाश दिलीप पवार (वय २४ सुप्रीम कॉलनी), विशाल देविदास मराठे (२३ रा.रायपूर कंडारी) आणि विनोद विश्वनाथ इंगळे (वय ३४ रा. उचंदा ता. मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...