आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावच्या प्रवशांना राजधानी मुंबईत घेऊन जाणारी अमरावती मुंबई-अमरावती (१२११२-१२१११) एक्स्प्रेस पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून अमरावती ते मुंबई या दोन शहरांदरम्यान दैनंदिन धावणा्रया या गाडीचे द्वितीय शयनयान श्रेणीचे (स्लीपर क्लास) पाच डबे येत्या १५ जूनपासून कमी करण्यात येतील. त्या ऐवजी तृतीय श्रेणी वातानुकूलितचे (थर्ड एसी) अतिरिक्त सहा डबे जोडले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्लीपरचे पाच डबे कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना मुंबईचा प्रवास खिशाला भुर्दंड देणारा ठरणार आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केली होती. त्या वेळी त्री साप्ताहिक असलेल्या या गाडीची लोकप्रियता वाढून ही गाडी पुढे दैनंदिन करण्यात आली.
वाढता प्रतिसाद पाहता गतवर्षी १४ जून २०२२ रोजी पारंपरिक कोच हटवून ही गाडी एलएचबी कोचद्वारे धावण्यात सुरुवात झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोच संरचना बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सर्वसामान्यांना मुंबईवारी घडवणारी ही एक्स्प्रेस पूर्णत: वातानुकूलित परिवतर्तीत झाली तर त्यांचा सर्वाधिक फटकाजरी सर्वसामान्यांना बसणार असला तरी थर्ड एसीचे अतिरिक्त डबे जोडल्याने कन्फर्म तिकीट मिळण्यास अधिक शक्यता निर्माण होणार आहे.
एसी ३ला मोजावे लागणार ७३० रुपये
जळगाव ते मुंबई आरक्षित तिकिटावर प्रवास करण्यासाठी स्लीपर कोचेचे भाडे २८५ रुपये प्रति व्यक्ती आहे. येत्या १५ जून नंतर स्लीपर कोचमध्ये कन्फर्म तिकीट न मिळाल्यास प्रवाशांना नाईलाजाने थर्ड एसीसाठी ७३० रुपये तर एसी टू चे तिकीट १०४० रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे.
आताची संरचना
बदलेली संरचना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.