आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालचाली‎ सुरू:मुंबई-अमरावती एक्स्प्रेस‎ वातानुकूलित करणार‎

जळगाव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावच्या प्रवाशांना राजधानी‎ मुंबईत घेऊन जाणारी अमरावती‎ मुंबई-अमरावती (क्रमांक‎ १२११२-१२१११) एक्स्प्रेस पूर्णपणे‎ वातानुकूलित करण्याच्या हालचाली‎ सुरू झाल्या आहे. अमरावती ते मुंबई‎ या दोन शहरादरम्यान दैनंदिन‎ धावणाऱ्या या गाडीचे द्वितीय‎ शयनयान श्रेणीचे (स्लीपर क्लास)‎ पाच डबे १५ जूनपासून कमी करण्यात‎ येऊन त्या ऐवजी तृतीय श्रेणी‎ वातानुकूलित (थर्ड एसी) अतिरिक्त‎ सहा डबे जोडले जाणार आहे.‎ दरम्यान, स्लीपरचे पाच डबे कमी‎ होणार असल्याने मुंबईचा प्रवास‎ भुर्दंड देणारा ठरणार आहे.‎ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही‎ तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील‎ यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केली‎ होती. त्या वेळी त्री साप्ताहिक‎ असलेल्या या गाडीची लोकप्रियता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाढून ही गाडी पुढे दैनंदिन करण्यात‎ आली.

वाढता प्रतिसाद पाहता गतवर्षी‎ १४ जून २०२२ रोजी पारंपरिक कोच‎ हटवून ही गाडी एलएचबी कोचद्वारे‎ धावण्यात सुरुवात झाली. त्यानंतर‎ आता पुन्हा एकदा कोच संरचना‎ बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने‎ घेतला आहे. सर्व सामान्यांना‎ मुंबईवारी घडवणारी ही एक्स्प्रेस‎ पूर्णत: वातानुकूलित परिवर्तीत झाली‎ तर त्यांचा सर्वाधिक फटका‎ सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला‎ बसणार आहे.

अशी आहे आताची संरचना‎
एसी फर्स्ट काम एसी टू टियर १/२,‎ एसी टू टियर २, एसी थ्री टियर ४,‎ स्लीपर ७, जनरल ४.‎ अशी राहिल बदलेली संरचना‎ एसी फर्स्ट काम एसी टू टियर १, एसी‎ टू टियर २, एसी थ्री टियर १०, स्लीपर‎ २, जनरल ४.

बातम्या आणखी आहेत...