आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिरोगी आरोग्यासाठी शुद्ध हवेत सकाळी-सायंकाळी फिरायला जात असाल तर सावधान!... कारण राज्यात अनेक शहरांत हवेतील प्रदूषण वाढले असून शनिवारच्या नोंदींनुसार यात मुंबई पहिल्या स्थानी, तर पाठोपाठ जळगावचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे दिवाळीतील प्रदूषणापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे.
वायू दर्जा निर्देशांकातून (एअर क्वालिटी इंडेक्स) ही माहिती समोर आली आहे. शहरांत रस्त्यांवरील खड्डे आणि अनेक शहरांत सुरू असलेली रस्ते-पुलाची व इतर कामे यामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. शनविारी दुपारी प्रदूषित हवेच्या निर्देशांकाने मुंबईत १७७ची पातळी गाठलेली असताना जळगावात ती गेल्या डिसेंबरपेक्षा १५ अंकांनी अधिक म्हणजे १६४ होती. ० ते ५० निर्देशांक शुद्ध हवेचे द्योतक मानले जाते.
ही आहेत कारणे... हवेतील आर्द्रता वाढली : थंडीमुळे हवेत आर्द्रता वाढली असून त्यामुळे हवेतील धुलिकण ओले होतात. ते उंच जाण्याऐवजी खाली येतात आणि शहरांवर दाट धुके पसरते. वाऱ्याचा वेग मंदावला : सध्या वाऱ्याचा वेग अत्यंत मंद आहे. गेल्या आठवड्यात ताशी ८ ते १० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे गेल्या दोन दविसांपासून चार किलोमीटर वेगाने वाहत आहेत. त्यामुळे हवेत जाणाऱ्या धुलिकणांचे वहन होत नाही. त्याच्या परिणामी पहाटेच्या वेळी शहरांवर अक्षरश: प्रदूषित वायूची चादर पांघरली जाते आहे. थंडीमुळे धुके : धुके पडले की त्यातील बाष्प धुलिकणांना वर जाऊ देत नाही. हवेतील इतर धोकादायक घटकांच्या बाबतीतही असेच होते. त्यामुळे थंडीच्या दविसात हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढते. यांच्यासाठी ही ‘धाेक्याची पातळी’ : प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या प्रदूषणाच्या पातळीनुसार एक्यूआय १५० ते २००च्या पातळीवर असेल तर ही हवा दमा, फुप्फुसाचे रुग्ण, हृदयविकार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धाेक्याची आहे. त्यामुळे सामान्यांना सर्दी, घसा खवखवणे, डाेळ्यांची जळजळ, शिंका, नाक काेंदणे असा त्रास हाेऊ शकताे. हायर अँटिबायोटिक ठरताहेत निष्प्रभ : जळगावातील छातीविकारतज्ञ डाॅ. कल्पेश गांधींनुसार प्रदुषणात संध्याकाळच्या वेळी १ तास फिरणे म्हणजे १० सिगारेट ओढण्यासारखे आहे. त्यामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो. सर्दी, खोकला, घसा खवखवणे बरे करण्यासाठी जास्त शक्तीची अँटिबायोटिक औषधेही निष्पभ्र ठरत आहेत.
हविाळ्यात हवा स्थिर असल्याने इंडेक्स वाढतो हविाळ्यात हवा स्थिर असल्याने धूलिकण उन्हाळ्याप्रमाणे हवेसाेबत वाहून जात नाहीत. त्यामुळे या दविसांत धूलिकणांचे हवेतील प्रमाण अधिक असते. परिणामी हवेची गुणवत्ता खराब हाेऊन एक्यूआय इंडेक्स वाढताे. - एस. टी. इंगळे, प्र-कुलगुरू तथा विभागप्रमुख पर्यावरण, पृथ्वीविज्ञान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.