आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:मनपाची परीक्षा 1500 गुणांनी झाली कठीण ; 9500 गुणांची स्पर्धा, कचऱ्यामुळे होतेय घसरण

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या निकालात मागे पडल्यामुळे मनपाची माेठी नामुष्की झाली. आता तर २०२३ मध्ये हाेणाऱ्या स्पर्धेचे निकष आणखी कडक झाले आहेत. आता ७५०० ऐवजी ९५०० गुणांची स्पर्धा हाेणार आहे. मनपाने शहरातील कचरा न घालवल्यास रॅँकिंग घसरण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील गुणांमधील बदलांसोबतच रेड स्पॉट्स आणि कचऱ्यापासून कमाईला महत्त्व मिळणार आहे. त्यामुळे एेनवेळच्या तयारीपेक्षा आतापासूनच कंबर कसावी लागेल.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेत जळगाव शहराची माेठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा २० क्रमांक कमी अर्थात राष्ट्रीय पातळीवर ८४ तर राज्य पातळीवर १५वा क्रमांक मिळाला. सार्वजनिक ठिकाणी हाेणाऱ्या साफसफाईकडे झालेले दुर्लक्ष आणि आेडीएफ प्लस तपासणीत आलेले अपयश या मागचे मूळ कारण आहे. त्यातुलनेत आगामी काळात हाेणारे सर्व्हेक्षणातील निकष आणखी कडक झाले आहेत. स्वच्छता सर्वेक्षण २०२३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अधिक कठीण होणार आहे. यंदाचे सर्वेक्षण मागील स्वच्छता सर्वेक्षणापेक्षा दाेन हजाराने जास्त अर्थात ९५०० गुणांचे असेल. विशेष म्हणजे यंदा सर्वेक्षणाचा विषयही ‘कचरा ते समृद्धी’ असा असेल. यामध्ये कचऱ्यापासून शहर समृद्ध करण्याची कामे पाहायला मिळतील.

ब्लॅक स्पाॅटच्या ठिकाणी सुशाेभिकरण : शहरातील कचऱ्याचे ठिकाण असलेल्या ब्लॅक स्पाॅटची यादी तयार केली जात आहे. उघड्यावर पडणारा कचरा टाळण्यासाठी त्या ठिकाणी सुशाेभिकरण करण्याचे नियाेजन सुरू आहे. जानेवारीत या स्पर्धेसाठी तपासणी हाेणार आहे. त्यामुळे मनपाच्या आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या टीमने नियाेजन सुरू केले आहे.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला महत्त्व नवीन सर्वेक्षणात घरोघरी जाऊन विलगीकरणा-साठीचे स्कोअर १० वरून १३ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा स्कोअर दोन वरून १० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. स्वच्छ वॉर्ड इंडिकेटरचा नागरिकनिहाय घटक, कचरा ते वंडर पार्कवरील इंडिकेटरसह, स्वच्छता अॅप इंडिकेटर अंतर्गत पिवळ्या स्पॉटचा स्कोअर १० वरून १८ टक्के करण्यात आला आहे. अपंग बांधवांच्या शौचालया साठीचे गुण ३ वरून ९ टक्के करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...