आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:सील केलेल्या कोरोना प्रभावित मुंबईतून पालिकेचा आरोग्य विभाग आणतोय नवापूरात कोरोनाचे संकट ?

नवापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नवापूरची रुग्णवाहिका मुंबईतील रुग्ण आणण्याचे काम करतीये

राज्यामध्ये कोरोना आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेला आहे. राज्यात 1018 तर सर्वाधिक मुंबई महानगरात 500 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कोरोनाचा मोठा हाहा:कार उडालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य, जिल्हा, तालुका बंदी केली आहे. लाॅकडाऊन दरम्यान प्रवास करण्यास बंदी असताना, नवापूर नगर पालिकेची रूग्णावहिका सील केलेल्या कोरोना बाधित मुंबई महानगरात जाऊन रूग्ण घेण्यासाठी पाठवली जात आहे. याबद्दल नवापूर शहरातील नागरिक, तालुका प्रशासनाने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. नवापूर तालुक्यात साधारण कोरोना प्रभावित क्षेत्रातून 2400 चे नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. कोरोनाचे संकट येऊ नये यासाठी नवापूर तालुक्यातील गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तहसीलदार सुनिता ज-हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी,यांचे नियोजनावर पालिकेच्या आरोग्य विभाग पाणी फिरवत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधीनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नवापूर शहरातील रुग्णवाहिकेचे काम नवापूर शहरातील आरोग्य सेवेसाठी आहे.रूग्ण घेण्यासाठी महानगर जाण्यासाठी आहे का ? मंगळवारी पहाटे मुंबईतील कोरोना आजाराचा सारखे लक्षणे असलेले एका रूग्णाला घेण्यासाठी आरोग्य विभागाने रुग्णवाहिका ऑनलाइन पत्रनुसार मुंबईला पाठवली होती. रुग्णवाहिकेतील चालक यांना परिवारासह घरी होम क्वारंटाईन केले आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र नजन यांनी दिली. मुंबईतून आलेल्या नवापूर तालुक्यातील रूग्ण देखील घरीच होम क्वारंटाईन केले आहे. आरोग्य विभागाची टिम लक्ष ठेऊन आहे. नगर पालिकेला आरोग्य विभाग कश्या पद्धतीने लाॅकडाऊन मध्ये रुग्णवाहिका प्रभावित क्षेत्रात पाठवली यासंदर्भात नोटीस दिली जाईल.अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...