आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदावर भरती:आकृतीबंधासाठी मनपा अधिकारी मंत्रालयात ; मंजुरीचा प्रस्ताव सादर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या सार्वजनिक प्रशासन विभागाने महापालिकेतील रिक्त जागा भरण्याच्यादृष्टीने महापालिकांचा आकृतीबंध मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने ज्या महापालिकांचा आकृतीबंध मंजुरीचा प्रस्ताव सादर आहे; परंतु अद्याप मंजूर झालेला नाही अशा सर्वच महापालिकांच्या अधिकाऱ्यांना तातडीने गुरूवारी मंत्रालयात पाचारण करण्यात आले आहे. आकृतीबंध मंजुरीचा प्रस्ताव सादर केलेल्या सर्वच महापालिकांकडून त्रुटींची पूर्तता करून येत्या पंधरा दिवसात मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाने महापालिकांमधील रिक्त जागा भरण्यासंदर्भात निर्देश दिले हाेते; परंतु अनेक महापालिकांच्या स्थापनेनंतरही आकृतीबंध मंजूर नाही. त्यामुळे किती जागा व काेणत्या पदावर भरती करायची याबाबत खुलासा हाेऊ शकलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...