आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना काळ:दहा हजार किलाे भंगारातून मनपाने मिळवले 4 लाख रूपये

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने आता भंगारातूनही महसुल मिळवले आहे. गेल्या दाेन वर्षात पालिकेच्या आवारात जप्त केलेल्या भंगाराचा लिलाव करण्यात आला आहे. दहा हजार किलाे लाेखंडाच्या माध्यमातून पालिकेच्या तिजाेरीत चार लाख रूपयांचा भरणा झाला आहे. काेराेना काळात सर्वच व्यवसायांना बंदी हाेती.

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते; परंतु त्यानंतरही लपून छपून व्यवसाय करत काेराेनाचा प्रसार करणाऱ्या हाॅकर्स व व्यावसायिकांवर जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली हाेती. यात माेठ्या प्रमाणात साहित्य जप्त करून ते सतरा मजलीच्या आवारात ठेवले हाेते. या भंगाराचा लिलाव केला. त्यात लाेखंडाचे वजन १० हजार ३५० किलाे आले असून त्यातून पालिकेला ३ लाख ९६ हजार रूपये मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...