आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाजपत्रक:हरित जळगावसाठी‎ मनपा करणार तरतूद‎

जळगाव‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सुंदर शहर, स्वच्छ शहर अन्‎ हिरवेगार शहर’ ही जळगावची‎ आेळख तयार करण्यासाठी‎ महापालिकेच्या अंदाजपत्रकात‎ विशेष तरतूद केली जाण्याची दाट‎ शक्यता आहे. येत्या दाेन दिवसांत‎ बजेट तयार करून महापाैरांकडे‎ सादर केला जाणार आहे. त्यानंतर‎ महासभेत त्यावर चर्चा हाेईल.‎ शहरात अमृत अभियानांतर्गत‎ पाणीपुरवठा, मलनि:स्सारण‎ याेजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.‎

आगामी काळात अमृत २.० या‎ अभियानाला सुरुवात हाेईल.‎ पहिल्या टप्प्यात माेठ्या प्रमाणात‎ खाेदकाम झाल्याने रस्त्यांच्या‎ कामाला गती मिळणार आहे. अशा‎ परिस्थितीत शहरातील स्वच्छता व‎ सुंदरतेसाठी विशेष प्रयत्न केले‎ जाणार आहे. अमृत अभियानांतर्गत‎ पहिल्या टप्प्यात हरीत क्षेत्रांचा‎ विकास करण्यासाठी सुमारे पाच‎ काेटींचा निधी मंजूर झाला हाेता.‎ आगामी काळात महापालिकेच्या‎ माध्यमातून पर्यावरणपूरक‎ जळगावसाठी विशेष प्रयत्न हाेणार‎ आहेत. शहराच्या सुंदरतेत भर‎ घालणाऱ्या बाबींना महत्त्व मिळेल.‎

बातम्या आणखी आहेत...