आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:खुनाच्या गुन्ह्यातील संशयित युवकाचा कासमवडीत पैशांच्या व्यवहारातून दगडाने ठेचून निर्घृण खून

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कासमवाडीतील मच्छी बाजारातील ओट्याजवळ गुरुवारी मध्यरात्री खुनाच्या गुन्ह्यातील संशयित युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सागर वासुदेव पाटील (वय 27 रा. ईश्वर कॉलनी ) असे मृत युवकाचे नाव आहे. सकाळी 9 वाजेच्या सुमारास मच्छी बाजारातील ओट्याजवळ सागरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. त्याची आई विमलबाई पाटील यांनी मृतदेह ओळखला. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

दोन तरुणार संशय

सागर हा गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला होता. त्याला बोलवण्यासाठी दोन युवक आले होते. त्यांच्या सोबत तो बाहेर गेला होता. तो रात्रभर घरी परतला नाही. आईने त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आला. नागरिकांनी घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांना कळविले. छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह त्याच्या आईने ओळखला त्याला बोलवण्यासाठी आलेल्या दोन युवकांवर पोलिसांना संशय आहे.

पैशांच्या व्यवहारातून खून

एमआयडीसी पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. सन 2015 मध्ये कासमवाडीतील युवकाच्या खून प्रकरणात सागर हा संशयित होता. पैशांच्या व्यवहारातून हा खून झाल्याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी त्याच्या आईच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मृत सागर यांच्या पश्चात आई पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...