आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत मैफलीचे आयोजन:स्वरसुधा अकादमीतर्फे संगीत मैफल

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील स्वरसुधा अकादमीतर्फे संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. त्यात सामूहिक तबलावादन, जुगलबंदी, गीतगायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पत्रकार भवनात हा कार्यक्रम पार पडला. स्वरसुधा अकादमीचे भूषण कोष्टी, कैलास कोष्टी, पंकज भावसार या प्रमुख कलाकारांसह श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश जोशी, दुष्यंत जोशी, गिरीश मोघे, पंकज भावसार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

शोनक दीक्षित, सिधेश चौक, श्रावणी जोशी, यांनी संवादिनीवादन केले. तबल्यावर समूह वादनात लोकेश सोनवणे, रोनित कोलते, मनीष पाटील, सचिन ओसवाल, श्रीधर जोशी, समृद्धी नाईक, गार्गी नाईक, विश्वेश कुलकर्णी, ओम जगदाळे यांनी सहभाग घेतला. प्रसन्न भुरे, सर्वेश चौक यांनी एकलवादन केले. अथर्वा मुंडले यांनी सुमधुर गायकीमधून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...