आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय‎:मुस्लिम बांधव राबवणार मस्जिद दर्शन‎ पंधरवडा; कार्यपद्धतीची देणार माहिती‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎मेहरूण परिसरातील १० मशिदींच्या ‎विश्वस्तांची स्नेह बैठक‎ एमआयडीसी पोलिस ठाण्यात‎ नुकतीच झाली. यात येत्या काही ‎ ‎ दिवसांत मस्जिद दर्शन पंधरवडा‎ राबवण्याचा निर्णय विश्वस्तांनी‎ घेतला. परिसरातील मस्जिद‎ विश्वस्तांकडून पोलिस प्रशासनास‎ असलेल्या अपेक्षा याबद्दल पोलिस‎ निरीक्षक जयपाल हिरे यांनी‎ मार्गदर्शन केले. यासह ट्रस्टींना‎ येणाऱ्या अडचणीही जाणून‎ घेतल्या.

एकमेकांच्या सामंजस्याने‎ अडचणी दूर करून दोन्ही धर्मियात‎ सलोखा निर्माण करण्याचे‎ ठरवण्यात आले.‎ हिंदू बांधवांना मस्जिद दाखवून‎ त्यातील प्रार्थना पद्धत, नमाजची‎ वेळ, अजानचे महत्त्व याविषयीची‎ माहिती नागरिकांना सांगण्यात येईल‎ व त्यातून शंकांचे निरसन होईल‎ असा ठराव अक्सा मस्जिद व‎ ‎इदगाई ट्रस्टचे सचिव फारूक शेख‎ यांनी मांडला. त्यास सर्वानुमते‎ अनुमोदन देण्यात आले. पोलिस‎ निरीक्षक जयपाल हिरे यांना‎ समितीकडून पुस्तक संच भेट‎ देण्यात आला. या वेळी मुफ्ती‎ अबुजर, मुफ्ती नुरुल हक, हाफिज‎ जाहीद, सलीम इनामदार, युसूफ‎ शेख आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...