आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • NAC Rating Is Important For Everyone Director Of Higher Education Dr. Regarding Recruitment, Promotion Of Professors. Information About Dhanraj Mane In Jalgaon

नॅक मानांकन सगळ्यांसाठी महत्त्वाचे:पदभरती, प्राध्यापकांच्या बढतीबाबत उच्च शिक्षण संचालक डॉ. मानेंची जळगावात माहिती

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व महाविद्यालयांनी नॅक मानांकन करुन घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात पदभरती तसेच प्राध्यापकांची बढती हे सुद्धा नॅकशी निगडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करुन घ्यावे. अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शुक्रवारी जळगाव येथे दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील कृती गटाने दिलेला अहवाल राज्य शासनाने स्वीकारला आहे. त्याअंतर्गत काही समित्या स्थापन केल्या असून या समित्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल लवकरच प्राप्त होईल आणि हे धोरण राबविले जाईल. असेही यावेळी ते म्हणाले.

शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्यावतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत डॉ. माने बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघर तिरंगा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी या दोन प्रमुख विषयांवर डॉ. माने यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

धोरणात आमूलाग्र बदल

डॉ. माने यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने अमुलाग्र बदल येऊ घातले आहे. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संस्थाचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना सोबत घेऊन हे धोरण राबविण्यासाठी सज्ज रहावे. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी यांनी सांगितले.

आपुलकीची भावना निर्माण व्हावी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विद्यापीठ, महाविद्यालये, गाव, घराघरात तिरंगा लावावा. देशाबद्दलची आपुलकी व राष्ट्रभक्तीची भावना भावी पिढीत वाढीला लागण्यासाठी प्राचार्यांनी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करावेत. असेही आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रभात फेऱ्या काढाव्यात असे आवाहन त्यांनी केलेय.

यावेळी झालेल्या चर्चेत प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. पी. एच. पवार, डॉ. के. बी. पाटील, डॉ. अरविंद चौधरी, डॉ. जे. बी. अंजने यांनी सहभाग घेऊन मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रा.एस.टी.इंगळे यांनी केला. प्रास्ताविक रासेयोचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...