आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या युगासोबत इश्वर भक्ती कशी करावी हे ऑनलाइन सांगितले जाते आहे. प्ले स्टोरमध्ये असे अनेक अॅप आले आहेत. त्यातून उपवास, नमाजाची पद्धती तसेच वेगवेगळ्या भाषांच्या अनुवादासह कुराण, पॉकेट कुराण आदी उपलब्ध होत आहे. याकडे खास करून युवावर्ग अधिक आकर्षित होत असल्याचे दिसून येते आहे.
सहेरी, इफ्तार, पाच वेळेच्या नमाजाची माहिती मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाहिली जाते आहे हे विशेष हाेय. मुस्लिम समाजात दिवसातून पाच वेळा नमाजाव्यतिरिक्त देखील ईश्वराचे स्मरण दिवसातून अनेक वेळा विविध पद्धतीने केले जाते. यात तस्बीहच्या (माळ) माध्यमातून देखील ईश्वराची आठवण केली जाते. यासाठी मोत्याची एक माळ असते. त्यात बोटांद्वारे मोत्यांची संख्या मोजण्यासह ईश्वराचे नावदेखील घेतले जाते.
मात्र, यात आता मोत्यांच्या तस्बीहच्या (माळ) जागेवर डिजिटल तस्बीह आली आहे. यात एक बटन लावलेले असते. ते बटन ईश्वराचे नाव घेणारा व्यक्ती परत-परत दाबत असतो. त्यामुळे आपण किती वेळा ईश्वराचे नाव घेतले ते डिजिटल स्कीनवर येते. ही डिजिटल माळही ऑनलाइन उपलब्ध हाेऊ लागली आहे. तसेच अनेक अॅप असेही आहेत ज्यातून कुराणची आयत ऐकू शकतो.
माेबाइल गेमची थीम रमजानच्या थीमवर मोबाइल गेम विकसित केले आहेत. त्यात उपवास ठेवणे, ५ वेळचा नमाजी होणे असे उपक्रम देण्यात येतात. यात एक खेळाडू कुटुंबीयांना उपवास ठेवणे व नमाज अदा करण्याचा अर्थ सांगतो. त्यात दोन मोड असतात. यात पहिला मोड हा रमजान तर दुसरा मोड हा ईद मोड असतो.
पाकीट कुराण उपलब्ध विविध भाषांमध्ये भाषांतरासह मिनी किंवा पाॅकेट कुराण ऑनलाइन उपलब्ध हाेते आहे. पाॅकेट कुराण आपण प्रवासात देखील सहज घेऊन जाऊ शकतो. तसेच प्ले-स्टोरमध्ये अनेक भाषांमध्ये कुराणचे मोबाइल अॅप्लिकेशन उपलब्ध आहे. ते आपण डाऊनलोड करून वाचू शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.