आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नामदेव महाराज सद‌्भावना यात्रा जिल्ह्यात 2 डिसेंबरला येणार; नंतर पंढरपूरचा प्रवास

जळगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतांचा विचार तळागाळापर्यंत पाेहाेचवण्यासाठी शिंपी समाजातर्फे संत शिराेमणी नामदेव महाराज जयंतीचे आैचित्य साधून ४ नाेव्हेंबरपासून पंढरपूर ते पंजाबमधील श्री क्षेत्र घुमान अशी सद‌्भावना यात्रा काढली आहे. ही यात्रा २ डिसेंबरला जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरात पाेहाेचणार आहे. त्यानंतर येथून ती पुढे पंढरपुरकडे जाणार आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२व्या जयंतीनिमित्त ही रथ व सायकल यात्रा निघाली आहे. २१०० किलोमीटर सायकल यात्रेचा समारोप श्री घुमान साहेब (पंजाब) येथे २७ नाेव्हेंबर राेजी हाेईल. त्यानंतर येथून ही यात्रा ४ डिसेंबरला पुन्हा पंढरपुरात पाेहाेचणार आहे. सायकल यात्रेत १०० सायकलपटू व सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील समाजबांधव श्रीघुमान साहेब येथे जात आहेत. संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास व माधव महाराज नामदास यांचे मार्गदशन मिळत आहे.

वारीत शंभरावर सायकलपटू : सायकलयात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडिंग केलेल्या आणि ५०पेक्षा अधिक वयोमान असलेल्या ८०पेक्षा अधिक सायकलपटूंनी सहभाग आहे. हा रथ आणि सायकल यात्रा महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब राज्यातून जाईल. राष्ट्रीयस्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा आहे. जिल्हाध्यक्ष बंडूनाना शिंपी, नथ्थू शिंपी, शिवदास सावळे, महेश शिंपी, चेतन खैरनार नियोजन करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...