आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदक:राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये नंदिनी दुसाने, पुष्कर शेवाळे यांना कांस्यपदक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र योगा असोशिएशनतर्फे श्रीरामपूर येथे विविध गटात राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. यात जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनतर्फे सहभागी नंदिनी दुसाने हिला मुलींच्या १२ ते १४ वयोगटात कांस्यपदक मिळाले. मुलांमध्ये पुष्कर शेवाळेला १२ ते १४ वयोगटात कांस्यपदक प्राप्त झाले.

वयोगट १४ ते ६मध्ये यश विसपुतेला चौथा क्रमांक प्राप्त झाला. वयोगट २५ ते ३०मध्ये दीपक पाटील याने सहावे स्थान मिळवले. नंदिनी दुसाने व पुष्कर शेवाळे यांची निवड योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ४७व्या राष्ट्रीय ज्युनिअर व सब ज्युनिअर स्पर्धेसाठी करण्यात आली. दोघांचा सत्कार प्रवीण पाटील, विराज कावडिया, सौरभ कुलकर्णी, डॉ. अनिता पाटील आदींनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...