आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:नशिराबादला ८० लाख खर्च करून केलेले उद्यान दोन वर्षांपासून बंद; आठ दिवसांत उद्यान सुरू न केल्यास भाजपने दिला उपोषणाचा इशारा

नशिराबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे सुमारे ८० लाख रुपये खर्च करून झिपरू अण्णा महाराज उद्यान उभारण्यात आले आहे; पण ते दाेन वर्षांपासून बंद आहे. हे उद्यान खुले करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात तत्कालीन ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून उद्यान विकसित केले आहे. उद्यानाचे काम होऊन दोन वर्षांहून अधिक काळ झाला तरी ते बंद आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले आहे. हे उद्यान आठ दिवसांत खुले न झाल्यास नगर परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपचे सरचिटणीस ललित बऱ्हाटे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...