आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना 12-24 वर्ष सलग सेवेनंतर निवड-वरिष्ठ श्रेणी लागू होण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषदेकडून प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असते. या प्रशिक्षणासाठी राज्यभरातील 94 हजार 541 शिक्षकांनी नोंदणी केली असून प्रत्येकी 2 हजार रुपये फी देखील जमा करण्यात आली आहे. मात्र सतत सर्व्हर डाऊनची समस्या दाखवत पुढील 2 ते 3 दिवस प्रशिक्षण बंद राहणार आहे. पहिल्याच दिवशी किचकट पद्धतीने राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा फज्जा उडाला आहे.
दरवर्षी शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येते. यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने ज्येष्ठ तज्ञ मार्गदर्शक हे प्रशिक्षण घेत असत. प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. गेल्या काही वर्षात हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते. यावेळी मात्र 94 हजार 541 नोंदणीकृत प्रशिक्षणार्थींकडून प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे करोडो रुपयांचे संकलन करून इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲप या संस्थेला हे काम SCERT कडून देण्यात आले आहे.
प्रत्यक्षात मात्र या संस्थेचा पहिल्या तासापासून प्रचंड गोंधळ उडाला आहे. मुळात 25 ते 30 वर्षे झालेल्या शिक्षकांना संगणकीय ज्ञान कमी आणि यांची ही किचकट प्रक्रिया यामुळे व मदतीला कोणीच नसल्यामुळे गोंधळ उडत आहे. तक्रार ऑनलाईन नोंदवायची असल्याने देखील शिक्षक अडचणीत आहे. परिणामी 60 तासांचे प्रशिक्षण कसे पूर्ण होणार याची चिंता पडली आहे. तासनतास लोक वाटत पाहत बसले. दुसऱ्या दिवशी ईमेलद्वारे शिक्षकांना कळविण्यात आले की पुढील दोन-तीन दिवस सर्व्हर बिघाडामुळे व अद्यावत करणे मुळे प्रशिक्षण बंद असेल.
या आल्या अडचणी
सॉफ्टवेअरवर लॉगिन होत नव्हते. एखाद्या शिक्षकाचे लॉगिन झाले तर स्वाध्याय पीडीएफ अपलोड होत नव्हते. प्रशिक्षणाचा १ जुन ते ३० जुन असा कालावधी ठेवला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर दुर्गम भागातील शिक्षकांना तर इंटरनेट अभावी ऑनलाईन प्रशिक्षण अजून त्रासदायक होणार आहे. शासनाने यात हस्तक्षेप करून हे प्रशिक्षण बंद करावे असे मागणी प्रवीण जाधव यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.