आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी दिल्ली येथील ९३ आणि ९४ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात जळगाव येथील राजू बाविस्कर, विकास मल्हारा आणि विजय जैन या तीन चित्रकारांना राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही खानदेशातील ऐतिहासिक गोष्ट आहे.
भारत सरकारच्या संलग्न असलेली ही सोसायटी असून १९४६मध्ये या सोसायटीचे पहिले चित्रप्रदर्शन झालेले आहे. गेल्यावर्षाचा कोरोनाचा काळ वगळता हे प्रदर्शन अखंडीत होते आहे. विकास मल्हारा आणि राजू बाविस्कर यांना पेंटिंगसाठी तर विजय जैन यांना ड्रॉईंगसाठी हा सन्मान प्राप्त झाला. ओशिन मल्हारा या तरुण चित्रकर्तीच्या चित्राचीही निवड करण्यात आली. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि १५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तिघे चित्रकार या राष्ट्रीय संस्थेच्या भविष्यातील कॅम्प किंवा वर्कशॉपसाठी पात्र ठरले आहेत. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी “एकाच वेळी तीन जणांना हा बहुमान मिळणे ही खूप आनंदाची, अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. चित्रकलेसाठी काम करणाऱ्या तरूण उमेदवारांसाठी ही प्रोत्साहित करणारी घटना आहे’ अशा शब्दात आनंद व्यक्त केला.
२४० कलाकृतींतून निवड
राष्ट्रीय आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात पेंटिंग, शिल्प, ड्रॉइंग आणि ग्राफिक या चार प्रकारांत हजारो कलाकृतीतून २४० कलाकृतींची निवड झाली होती. त्यातून ३० कलाकृतींना पारितोषिके देण्यात आली. पद्मभूषण राम सुतार, डॉ. करण सिंग यांच्याहस्ते पारिताेषिक वितरण झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.