आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:एकनाथ खडसेंच्या विजयासाठी जळगावात राष्ट्रवादीचा महादेवाला अभिषेक; फडणवीसांवर डागले टीकास्त्र

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक किसानतर्फे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या विजयासाठी कालिका माता मंदिरातील महादेवाला अभिषेक करण्यात आला. त्यांच्यावरची इडी पिडा टळू दे,असे साकडे महादेवाला घालण्यात आले.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महादेव स्तोत्र म्हणून विधीवत पूजा केली. बत्यानंतर महादेवाला अभिषेक घालण्यात आला. गेल्या साडेतीन वर्षांपासून खडसे यांच्या ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यानंतरही खडसे खचले नाहीत. त्यांची खंबरीपणे सर्व चौकशी व आरोपांना उत्तरे दिली. त्यांनी संघर्ष सुरुच ठेवला. त्यांच्याविरुध्द कटकारस्थाने करण्यात आली. ज्यांना त्यांनी मोठे केले, त्यांनीच खडसेंविरुध्द कटकारस्थाने केली.

त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. महसूल मंत्री असताना त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. तरीही खडसे डगमगले नाहीत. त्यांनी धिरोदात्तपणे परिस्थीतीचा सामना केला. विरोधकांना पुरून उरले. त्यांची विधानपरिषदेवर नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रलंबित ठेवली. बहुजन नेतृत्वाला शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. विधानपरिषद निवडणुकीत खडसे विजयी व्हावेत. त्यांनी महाविकास आघाडीचे हनुमान बनावे. त्यांना लवकरच मंत्रीपद मिळून उत्तर महाराष्ट्राचा रखडलेला विकास करावा. प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावेत, असे राष्ट्रवादी किसान युवकतर्फे महादेवाला साकडे घालण्यात आले.

या पदाधिकाऱ्यांनी होती उपस्थिती

राष्ट्रवादी युवाक किसान संघटनचे जिल्हाध्यक्ष सूरज नारखेडे, ललित नारखेडे, सिध्दार्थ सपकाळे, चेतन इंगळे,उमाकांत पाटील, पंकज व्यास, मंगेश भोळे, राकेश चौधरी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...