आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, उपचारांसाठी मुंबईकडे रवाना

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असे अवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन याविषयी माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यानंतर आता एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...