आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीतून सरकार बदलले, राज्यात काहीही होऊ शकते:खडसेंचे भाकीत, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांची अस्वस्थता वाढेल

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आत्तापर्यंत रात्रीतून सरकार बदलले आहे. काही सरकार खोक्यांमुळे बदलले तर काही अशीच बदलली. राज्यात काहीही होऊ शकते. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही जण नाराज होतील व त्यांची अस्वस्थता बाहेर येईल असे भाकीत राष्ट्रवादीचे नेत एकनाथ खडसे यांनी आज केले. ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले खडसे?

खडसे म्हणाले, आत्तापर्यंत रात्रीतून सरकार बदलले आहे. काही सरकार खोक्यांमुळे बदलले. राज्यात काहीही होऊ शकते. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही जण नाराज होतील. काही सरकार खोक्यांमुळे तर काही असेच बदलले. खडसे म्हणाले, एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात फार मोजक्याच आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले बाकीच्यांना मिळणार नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास इतर आमदारांतील अस्वस्थता वाढेल, ती बाहेरही येईल.

'चावट' शब्दावर ठाम

मंत्री गिरीश महाजन यांना चावट या शब्द संबोधल्यावरुन एकनाथ खडसे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. काही शब्द खानदेशात वारंवार वापरले जातात. त्यात हा शब्दही बोलीभाषेतील आहेत पण बाहेरच्या लोकांना तो अश्लिल वाटतो. मला चावट म्हटले तरीही काही वाटणार नाही.

महाजनांना टोला

खडसे मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून म्हणाले की, गिरीश महाजन यांना चावट म्हटले याचा त्यांनी वेगळा अर्थ काढला. त्यांच्या मनात चांगल्या भावना नसतात, इकडे तिकडे नजर पाहण्याच्या त्यांच्या वेगळ्या भावना असतात. त्यांना जर चावट म्हटल्याचे दुःख झाले असेल तर मला त्यांनी चावट म्हणावे, मी त्यांना माफी मागायला लावणार नाही-

बातम्या आणखी आहेत...