आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघाची निवडणूक:राष्ट्रवादीचे पदाधिकारी ‘सर्वपक्षीय’च्या वाटेवर! ; खडसेंचे ‘वेट अँड वाॅच’

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत आमदार एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलची भिस्त असणाऱ्या प्रमुख उमेदवारांचा ओढा सर्वपक्षीय पॅनलकडे आहे. त्यामुळे आमदार खडसे सध्या विराेधकांच्या रणनीतीवर लक्ष ठेवून आहेत. नेतृत्व बदलले तरी संघात सर्वपक्षीयची परंपरा कायम ठेवावी हा झेंडा खांद्यावर घेऊन काही उमेदवार सर्वपक्षीय पॅनलसाठी आग्रही आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवस उरले असताना राष्ट्रवादीच्या गाेटात पॅनलच्या हालचाली गतिमान झालेल्या नाहीत. काेणत्या उमेदवारांना साेबत घ्यावे याबाबत खडसे गटाकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू आहे. असे असताना आतापर्यंत केवळ दाेनच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्यावर्षी आमदार खडसे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनल तयार केले हाेते. आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हाती सर्वपक्षीय पॅनलची सूत्रे आहेत.

या पदाधिकाऱ्यांवर भिस्त
भाजपविराेधात राष्ट्रवादीचे पॅनल तयार करायचे असल्यास राष्ट्रवादीला आमदार अनिल पाटील, माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव माेरे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेनेच्या गाेटातून महापाैर जयश्री महाजन यांचा काैल महत्त्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...