आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात राष्ट्रवादी आक्रमक:देहू येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू न दिल्याने निषेध

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करु दिल्याबद्दल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

त्याबाबत बुधवारी राष्ट्रवादीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही निषेध व्यक्त केला. मंगळवारी श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिर लोकार्पण समारंभ झाला. या सभेस मार्गदर्शन करण्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून परंपराही आहे. पंतप्रधान उपस्थित असताना कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार पवार यांना भाषण करु देणे अपेक्षित होते. त्यांना भाषण करु देण्यापासून रोखल्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

यापुढे केंद्र सरकारने याबाबतीत दक्षता घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक कार्याध्यक्ष सुनील शिंदे, जितेंद्र गाजरे,संजय जाधव, अकील पटेल, चंद्रमणी सोनवणे, विनोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...