आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस:दुकानदार, सेल्समनचे दुर्लक्ष; एक लाखांचे दागिने लंपास

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत ग्राहकांची गर्दी असल्यामुळे रोजच्या हिशेब तपासणीत दुर्लक्ष केल्यामुळे अज्ञात व्यक्तीने १ लाख २६५९ रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.अभिषेक सुनील बाफना (रा. दीनानाथवाडी) यांचे रिंगरोडवर ‘हाउस ऑफ ज्वेलर्स बाय बाफनाज’ नावाचे दुकान आहे. या दुकानात पाच सेल्समन कामावर आहेत.

दरम्यान, दिवाळीत दुकानात ग्राहकांची माेठी गर्दी होती. यामुळे २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान दुकानमालक बाफना व सेल्समन यांनी दैनंदिन हिशेब केला नाही. आता गर्दी कमी झाल्यामुळे बाफना यांनी दोन दिवसांपूर्वी सर्व दागिने, पैशांचा हिशेब केला. यात गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. यात सोन्याचे मंगळसूत्र, डायमंडचे २ मंगळसूत्र व २ अंगठ्या असा एेवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...