आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:गायडन्सच्या बेटी बचाव बेटी पढाव‎ घोषवाक्य स्पर्धेमध्ये नेहा माळी प्रथम‎

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायडन्स फॉर नीडेड संस्थेतर्फे ‘बेटी‎ बचाव बेटी पढाव’ या विषयावर‎ घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या‎ स्पर्धेत २५ युवतींनी सहभाग घेतला.‎ स्पर्धेच्या माध्यमातून महिलांविषयी‎ नेहमी आदर बाळगा असा संदेश‎ देण्यात आला. यासह ‘तू आहेस‎ महान या विश्वाची आहे शान,‎ महिलाच आहे जीवनाचा आधार,‎ म्हणून तिचा करा आदर’ आदी‎ घोषवाक्य लिहिण्यात आले होते.‎

उत्कृष्ट घोषवाक्यासाठी प्रथम‎ क्रमांक नेहा माळी, द्वितीय क्रमांक‎ धनश्री जाधव, तृतीय क्रमांक महिमा‎ पाटील यांनी बक्षीस मिळवले.‎ विजेत्यांना संस्थेचे प्रमुख पराग‎ अत्तरदे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात‎ आली. या वेळी परिसरातील‎ नागरिक, महिला उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...