आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन रिंगराेडची निर्मिती:रिंगराेडसाठी गिरणेवर नवीन दाेन उड्डाण पूल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहराला वळसा घालून तयार करण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या कामाला गती दिली जाणार आहे. याच रिंगरोडला जोडण्यासाठी गिरणा नदीवर दोन नवीन उड्डाण पूल उभारले जाणार आहेत. या संपूर्ण कामासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे.शहरातून जाणाऱ्या महामार्गाप्रमाणे संपूर्ण शहराला वळसा घालून नवीन रिंगराेडची निर्मिती केली जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाळधीपासून सावखेडापर्यंत नऊ गावांना जाेडणाऱ्या ४७ किलाेमीटर लांबीच्या रस्त्याची निर्मितीचे काम सुरू आहे. या मार्गात पाळधी-फुपनगरीला जाेडणाऱ्या पुलाची तसेच सावखेडा गावाजवळ नदीवर स्वतंत्र पुलाची उभारणी केली जाणार आहे. संपूर्ण रिंगरोडच्या कामावर सुमारे १०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात रस्त्याच्या कामासाठी ५० कोटी तर दोन उड्डाण पुलांसाठी ५० कोटी खर्च अपेक्षित आहेत. या वर्षभरात मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...