आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:शहराचा विस्तार लक्षात घेता नवीन विकास; आकृतिबंधासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहराचा विस्तार लक्षात घेता नवीन विकास आराखड्याला मंजुरी घेणे तसेच आकृतिबंधाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून नव्याने सादर करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी महापौर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड रवाना होणार आहेत. गेल्या आठवड्यात महापाैर महाजन यांनी मंत्रालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यात मेहरूण तलावाच्या काठावरील शिवाजी उद्यानाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधीची मागणी केली.

त्यानुसार पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आकृतिबंधाच्या प्रस्तावात त्रुटी आढळल्याने १०० जागांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय उड्डाण पदाेन्नतीमुळे १२०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर टांगती तलवार आहे. शहराचा विस्तार वाढत असताना नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या सर्वच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महापौर महाजन व आयुक्त गायकवाड मंगळवारी मुंबईला रवाना होणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून रविवारी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...