आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमळनेर:शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली मात्र ती गुपित, अनिल देशमुखांची माहिती

व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी यासाठी लवकरच राज्यात नवीन कायदा करण्यात येणार असून हा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल. आंध्र प्रदेशात जाऊन दिशा कायद्याबाबत चर्चा केली होती. असाच कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी येत्या अधिवेशनात ठराव मांडण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमळनेरात केली. राज्यात लवकरच २,५२८ पदांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया करण्यात येणार असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. अमळनेर येथे पोलिस वसाहतीचे उद्घाटन रविवारी दुपारी ३ वाजता देशमुख यांच्या हस्ते झाले त्यानंतर ते बोलत होते.

विधान परिषदेसाठी १२ नावे ठरली मात्र ती गुपित :

विधान परिषदेसाठी १२ नावे ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत. ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

खडसे यांची कार्यक्रमास अनुपस्थिती...

अमळनेर येथे पोलिस वसाहतीच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते. याबाबत कार्यक्रमस्थळी चर्चा सुरू होती. वसाहतीच्या उद्घाटनानंतर मात्र खडसे हे आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहाेचले. या वेळी त्यांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा झाली. तत्पूर्वी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत शहादा येथे झालेल्या कार्यक्रमास ते उपस्थित होते.