आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता:रात्रीचे तापमान 8.6 अंशांवर; पहाटे धुके, गारठाही वाढणार

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाेव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीलाच तापमानात माेठी घसरण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तापमानात घट कायम असून, बुधवारी किमान तापमान ८.६ अंशांवर हाेते. तापमान नीचांकी पातळीवर असल्याने जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कायम आहे.राज्यात सध्या जाेर पकडलेल्या थंडीसाठी उत्तरेतून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्याचे कारण सांगितले जात आहे.उत्तरेत थंडी अधिक आहे.

तिकडचे थंड वारे महाराष्ट्रातून दक्षिणेकडे वाहत असल्याने राज्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. किमान तापमानात घट झाली असून, तापमान १५ अंशांवरून ८ अंशांपर्यंत खाली आलेले आहे. गेल्या तीन दिवसांत किमान तापमान ८ अंशांवर स्थिरावले आहे.

सकाळी ११.३० वाजेपर्यंत थंडी
किमान तापमानासाेबतच कमाल तापमानात देखील घट झाल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत गारठा जाणवत असून,दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा थंडी जाणवते. त्यामुळे रात्रीसह दिवसादेखील थंडी जाणवत आहे. रब्बीसाठी ती पाेषक आहे.

बातम्या आणखी आहेत...