आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयंकर अपघात:नीलगायीच्या धडकेत प्रवासी रिक्षा कलंडली, एक ठार, आठ जखमी

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावरुन भरधाव वेगात येणाऱ्या प्रवासी रिक्षेस रस्ता ओलांडणाऱ्या नीलगायीने धडक दिली. या अपघातात रिक्षेतील एक प्रवासी जागीच ठार झाला तर उर्वरीत आठ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री आठ वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावरील टीव्ही टॉवर समोर हा अपघात झाला.

घटना अशी की, एमएच 19 व्ही 9521 क्रमांकाची रिक्षा भुसावळहुन प्रवासी घेऊन जळगावकडे निघाली होती. टीव्ही टॉवरजवळ रस्ता ओलांडणारी नीलगाय थेट रिक्षेस धडकली. यात रिक्षेने दोन पलटी घेतल्या. अपघातात भुसावळमधील एक प्रवासी रिक्षेखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. त्याची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर रिक्षेत बसलेले प्रवासी नसीम शेख बागवान (वय 65, आदिल मकबुल बागवान (वय 13, दोघे रा. तांबापुरा) हे गंभीर जखमी झाले

. अपघातानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी व मृतास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले. तर काही जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

---------

बातम्या आणखी आहेत...