आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नऊ आमदार निवडून येतील : डॉ.सतीश पाटील

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी निवडणुकांची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीची जिल्हा बैठक शनिवारी जिल्हा कार्यालयात झाली. त्यात प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डाॅ. सतीश पाटील यांनी ‘जिल्ह्यात पक्षाचे आठ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र, आमदार एकनाथ खडसेंनी ठरवले तर भुसावळच्या जागेसह ही संख्या नऊपर्यंत जावू शकते’ असे विधान केले. त्यावर ‘अगाेदर जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून दाखवा. त्यानंतर किती आमदार येतील ते ठरेल’ असे प्रतिउत्तर खडसेंनी दिले. त्यामुळे ही बैठक अधिक चर्चेची ठरली. ​​​​​​

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील ५ आमदारांविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेे आहेत. आता राज्यातील परिस्थिती बदलली आहे. सत्तांतरानंतर जनतेत रोष आहे. हे वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. या पाच मतदारसंघांसह किमान सात आमदार जिल्ह्यातून निवडून आणण्याचे मिशन राष्ट्रवादीतर्फे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पाच मतदारसंघात ‘पन्नास खोके, एकदम ओके’ लिहिलेले टी-शर्ट वाटप करण्यात येतील असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ईडी, सीबीआय, दूध संघ अशी सर्व चौकशी सुरू असली तरी राष्ट्रवादीच जिंदाबाद आहे. पक्षात नवीन असल्याने डॉ. सतीश पाटील सांगतील, तसे काम करू, असे आमदार खडसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...