आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या 9 रेल्वे गाड्या रद्द:भादली स्थानकावरील कामाचा फटका, सोमवारी अनेक गाड्यांचा खोळंबा

प्रतिनिधी | जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भादली स्थानकावर ७ नोव्हेंबर रोजी चौथ्या लाइनचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामामुळे सोमवारी रात्री १२ वाजेनंतर नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ९ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

चौथ्या लाइनच्या या कामामुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना विविध स्थानकात थांबवण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली.

भादली रेल्वे स्थानकात चौथ्या लाइनचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ७ व ८ नोव्हेंबरदरम्यान मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. यात (गाडी क्र. ११११३-१४) देवळाली-भुसावळ पॅसेंजर, (गाडी क्र.११९२०-२१) इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेस, (गाडी क्र. १९००५-६) भुसावळ-सुरत पॅसेंजर ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

(गाडी क्र. १९००७-८) भुसावळ-सुरत पॅसेंजर, (गाडी क्र. ०९०७७-७८) भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस, (गाडी क्र. १११२७-८) भुसावळ-कटनी पॅसेंजर, (गाडी क्र. १२११२-११) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. (गाडी क्र. ११०२६-२५) पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व (गाडी क्र. १२११४-१३) नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी ८ व ९ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांचा खोळंबा

पुण्याकडे जाणाऱ्या हटिया एक्सप्रेसला भुसावळला थांबवण्यात येणार आहे. तर, मुंबईकडे जाणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेस व गोरखपूर एक्सप्रेसला भुसावळला थांबण्यात येणार आहे. तर निझामुद्दीन एक्सप्रेसला जळगावी, गोरखपूर एक्सप्रेसला शिरसोनी तर नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेसला म्हसावद स्थानकात थांबवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...