आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थिनींना‎ निर्भया पथकाने दिले स्वसंरक्षणाचे धडे‎

जळगाव‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजकंटक, रोडरोमिअाेंचा‎ मुकाबला करण्यासाठी तसेच‎ स्‍वरक्षणासाठी जिल्हा पोलिस‎ दलाच्या निर्भया पथकातील‎ एपीआय मंजुळा तिवारी यांनी जी.‎ एच. रायसोनी अभियांत्रिकी व‎ बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात‎ महिला सन्मान सप्ताहात‎ विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे‎ दिले. यात स्वरक्षण करण्यासाठी‎ लाठीचा वापर, घ्यावयाची दक्षता,‎ अडचणींच्या प्रसंगात स्वतःचा‎ बचाव करता यावा, यासाठी मुलींना‎ स्वसंरक्षणाचे धडे व मार्गदर्शन केले.‎

प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी‎ विद्यार्थिनींना आज स्वयंपाक,‎ शिवणकला, व्यावहारिकतेचे‎ धड्यांसह स्वसंरक्षणाचे धडे देणे‎ जास्त गरजेचे असल्याचे मत व्यक्त‎ केले. तर सायबर सेलचे पोलिस‎ उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पोलिस‎ कॉन्स्टेबल अरविंद वानखेडे यांनी‎ सायबर सुरक्षितता आणि‎ जागरूकता या विषयावर मार्गदर्शन‎ केले. कार्यक्रमासाठी प्रा. श्रेया‎ कोगटा, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. प्रिया‎ टेकवानी यांनी सहकार्य केले. प्रा.‎ डॉ. सोनल पाटील यांनी‎ सूत्रसंचालन केले. प्रा. कल्याणी नेवे‎ यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...