आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षणाचा श्रीगणेशा:ना अँड्रॉइड मोबाइल, ना इंटरनेट; कॉनकॉलवर ऑनलाइन शिक्षण, 30 टक्के अभ्यासक्रम पूर्ण, मोंढाळा पॅटर्नचा आदर्श

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच पालकाच्या मोबाइलवर अनेक विद्यार्थी असे अभ्यास करतात. - Divya Marathi
एकाच पालकाच्या मोबाइलवर अनेक विद्यार्थी असे अभ्यास करतात.
  • मोंढाळ्याच्या जिल्हा परिषद शिक्षकाने ऑनलाइन शिक्षणाच्या अडचणींवर केली पालकांच्या मदतीने मात

आॅनलाइन शिक्षणासाठी ग्रामीण भागात कुठे अँड्राॅइड फोनच नाही फाेन असला तर रेंजच नाही अशी स्थिती आहे. भुसावळ तालुक्यातील एका शिक्षकाने मोबाइलवरून पालकांना काॅन्फरन्स काॅल करून स्पीकर फोनद्वारे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी ३० टक्के अभ्यासक्रम आतापर्यंत पूर्णही केला आहे. नामदेव महाजन असे या जिल्हा परिषद शिक्षकाचे नाव आहेे

विद्यार्थी व पालक आनंदी
मोंढाळ्याची शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची आहे. शाळेत तीन शिक्षक असून ते सर्वच मोबाइल काॅलिंग वापरतात. विद्यार्थ्यांना त्यांचे सर्व विषय मोबाइलवरूनच शिकवले जात आहेत. लवकरच या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून परिणाम आणखी स्पष्ट होतील.

२० विद्यार्थ्यांशी संवाद
यात अनेक विद्यार्थ्यांशी एकाचवेळी संवाद साधता येत असल्याने शिक्षण देणे सोपे झाले आहे. विद्यार्थी व पालक खुश आहेत. आता ते कॉलची प्रतीक्षा करतात. नामदेव महाजन, शिक्षक, मोंढाळे

विद्यार्थ्यांची पालकांसह शाळा
- आता विद्यार्थी व त्यांचे पालक रोज वाट पाहतात ‘त्या’ फोनची
- पालकांच्या फोनमध्ये बॅलन्स असो अगर नसो, रोजची शाळा भरतेच
- या हजारो विद्यार्थ्यांची हाेईल चाचणी परीक्षा

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser