आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​अधिसभा निवडणूक:प्राचार्यांच्या गटातील 10 जागांसाठी 231 काॅलेजांतून उमेदवार मिळेना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्राचार्य गटासाठी उमेदवारांना ‘नॅक’ आवश्यक आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात एकूण २३१ महाविद्यालये आहेत. या ठिकाणी फक्त ७९ महाविद्यालयातच प्राचार्य कार्यरत आहेत. उर्वरित १५२ महाविद्यालयांत प्रभारी प्राचार्य काम करताहेत. महाविद्यालयात नियमित प्राचार्य नसल्याने ‘नॅक’ होत नाही. परिणामी नॅक व रिक्त जागांअभावी यंदा अधिसभेवर प्राचार्यांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी फक्त खुल्या व मागासवर्गीय, महिला वर्गासाठीच अर्ज आले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती या संवर्गासाठी एकही उमेदवार मिळाला नाही.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे. अधिसभेसाठी ४६ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत तर विद्यापरिषदेसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

नॅकची अट महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी याेग्य नवीन विद्यापीठ कायद्यात नॅकची अट ही महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी टाकण्यात आलेली आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी कायदा आल्यानंतर महाविद्यालयांनी नॅकसाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, महाविद्यालयांनी नॅक केले नाही; परिणामी ते सिनेटसाठी पात्र झाले नाहीत. हे प्राचार्य व महाविद्यालयांचे अपयश आहे. कायदा विद्यार्थी हितासाठी आहे हे महाविद्यालयांनी लक्षात घ्यावे. - डॉ. अनिल राव, माजी प्राचार्य

बातम्या आणखी आहेत...