आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • No Concrete Was Poured Under The Gutter Up To Shahunagar Pimprala Railway Gate; Citizens Shout That Sewer Work Is Not Done Properly |marathi News

बनवाबनवी:शाहूनगर-पिंप्राळा रेल्वे गेटपर्यंतच्या गटारीखाली काँक्रीटच ओतले नाही; गटारीचे काम व्यवस्थित झाले नसल्याची नागरिकांची ओरड

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहूनगरपासून ते थेट पिंप्राळा रेल्वे गेटपर्यंत लॉकडाऊन काळात तयार करण्यात आलेली गटार परिसरातील नागरिकांसाठी गैरसाेयीची ठरत आहे. तीन फूट रुंद, पाच फूट खोल गटारीचे कामच व्यवस्थित झाले नसल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे. या गटारींच्या अशास्त्रीय कामामुळेच या गटारीत कचरा अडकून गटारीतून पाण्याचा निचरा हाेत नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याची बाब नित्याची झाल्याने रहिवाशांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहे.

शाहूनगर ते भोईटेनगर रेल्वे गेटदरम्यान लॉकडाऊन काळात तीन फूट रुंद व पाच फूट खोल गटारी तयार करण्यात आल्या होत्या. या गटारींमुळे आपली पाणी तुंबण्यापासून सुटका होईल, अशी या परिसरातील नागरिकांची भावना होती; मात्र थोड्याच दिवसांत येथील नागरिकांचा भ्रमनिरास झाला. या गटारींच्या दोन्ही बाजूला भिंती तयार करण्यात आल्या; मात्र जमिनीलगत काँक्रीट न ओतल्याने ठिकठिकाणी असाऱ्या उघड्या पडून त्यात कचरा अडकून पाण्याचा निचरा न झाल्याने या गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या गटारींची नियमित साफसफाई केली जात नसल्याने पाणी रस्त्यावरून वहायला लागल्यानंतर पालिकेला जाग येते. त्यानंतर जेसीबीद्वारे येथून तुंबलेल्या कॅरिबॅगा, गाळ काढण्यात येतो. हा गाळ देखील जेसीबीने उचलण्यात येत असल्याने नागरिकांनी घर, दुकानासमोर स्वखर्चाने टाकलेले ढापे तुटत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, परिसरात महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन गटारी तयार केल्या आहे. तरी देखील गटारीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने गटारीच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

स्वखर्चाने टाकलेले ढापे नेहमी तुटतात
गटार शाहूनगरातील हनुमान मंदिरापासून वाहून येत असल्याने या गटारीत मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगा, कचरा व गाळ साचतो. हा गाळ काढण्यासाठी व काढलेला गाळ उचलण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गटारीवर स्वखर्चाने टाकलेले ढापे तुटतात. दर दोन-चार दिवसांत ही गटार ओव्हरफ्लो होते. त्यामुळे नियमित गटारी साफ करण्याची गरज आहे.
- जनार्दन भोळे, दत्त कॉलनी.

बातम्या आणखी आहेत...