आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्राने १८ जुलैपासून नव्याने लागू केलेल्या जीसटी करातील वाढीबद्दल व्यापाऱ्यात संभ्रम निर्माण झाला हाेता; मात्र २५ किलो आणि त्यापेक्षा कमी पॅकिंग व लेबलिंग केलेले खाद्यपदार्थांवर जीएसटी लागणार आहे. नुकत्याच आलेले स्पष्टीकरण आणि १३ जुलैच्या नाेटिफिकेशननुसार प्री पॅक व लेबलिंग केलेल्या वस्तूवरच जीएसटी लागणार आहे. सुट्या किंवा ठाेक वस्तूवर ताे लागणार नसल्याचे सीए साैरभ लाेढा यांनी रविवारी स्पष्ट केले. एकता रिटेल किराणा व्यापारी असाेसिएशनतर्फे आयाेजित बैठकीत सीए साैरभ लाेढा यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी कराच्या नवीन अंमलबजावणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जर माल पूर्व पॅक नसेल किंवा पॅकिंग २५ किलो पेक्षा अधिक असेल तर जीएसटी लागणार नाही. तसेच रिटेल पॅक म्हणजेच २५ किलो व त्याखाली असलेले पूर्व पॅक आणि लेबल लागलेले खाद्यपदार्थ हेच ५ टक्के जीएसटी मध्ये येणार आहे, असे लाेढा यांनी सांगितले. बैठकीला अध्यक्ष ताराचंद कृपलानी, माजी अध्यक्ष ललित बरडिया, धर्मेंद्र जैन, अनिल कांकरिया, डाॅ. तुषार चाेटाणी, सतीश अग्रवाल उपस्थिती हाेते. मनाेबलचे यजुर्वेंद्र महाजन, डाॅ. तुषार चाेटाणी यांचे चर्चासत्र झाले. शाबीर भावनगरवाला यांनी सूत्रसंचालन केले. हा बसू शकेल सर्वसामान्य नागरिकांना फटका सरकारने ब्रँडेड व पॅकिंग करून मोठ्या प्रमाणात नफा कमावणाऱ्या कंपन्यांना टॅक्स लावणे या उद्देशाने आणलेले हे बदल आता सामान्य नागरिकाला महाग पडू शकते. सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात पूर्व पॅक केलेले व लेबल असलेले खाद्य पदार्थ वापरतात; पण आता फक्त सुटे खाद्य किंवा ठोक प्रमाणात विकत घेतलेल्या पदार्थांवर जीएसटी नसणार हे मात्र जाणून घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.